ब्रेकिंग न्यूज

सोरट जुगारावर बीड शहर पोलिसांचा छापा.

35 हजारांच्या मुद्देमालासह एक ताब्यात;बीड शहर पोलिसांची तत्पर कारवाई.

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील भाजी मंडई परिसरात ऑनलाईन गेमच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध सोरट जुगारावर बीड शहर पोलिसांनी तत्पर कारवाई करत 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवारी (दि.10) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

बीड शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत छापा मारला. यावेळी सुरू असलेला सोरट जुगार उघडकीस आला. कारवाईदरम्यान रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील,पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोहेकॉ शाहीनशा सय्यद, पोलीस अंमलदार इलियास शेख, मंगेश शिंदे, संतोष तांबे व सचिन वाघमारे यांनी केली.या तत्पर कारवाईमुळे अवैध धंदे करणारा खळबळ उडाली.

बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी दिली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button