ब्रेकिंग न्यूज

मोठी कारवाई!कत्तलसाठी जनावरे घेऊन जाणारा कंटेनर केज पोलिसाच्या ताब्यात.

जनावरांची सुटका,ट्रक चालक फरार गोरक्षकांच्या माहितीवर पोलिसांची कारवाई.

बीड( प्रतिनिधी)मागील महिन्यातच बीड शहरातील मोमीनपुरा भागात तीन वेळा कत्तलसाठी डांबून दाबून ठेवलेले जनावरांची सुटका बीड पोलिसांनी केली होती ही घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यात गोवंश वाहतुकीविरोधात आणखी एक मोठी कारवाई समोर आली आहे. गोरक्षकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केज पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी नेले जात असल्याचा संशय असलेला कंटेनर मधील जाणवरांची सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. 29 जून) रोजी पहाटे सुमारे 3 वाजता आंबाजोगाई–केज रस्त्यावर MH-20 DE-3029 क्रमांकाच्या कंटेनरमधून गोवंश, जनावरे वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यांनी तात्काळ डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांना याबाबत कळवले.

माहिती मिळताच केज पोलिसांनी तातडीने सापळा रचून पिसेगाव जवळील पेट्रोल पंपाजवळ कंटेनर अडवला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच कंटेनरचा चालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये 25 देशी नंदी (बैल) आढळून आले. याशिवाय एका बोलेरो पिकअपमधून 7 देशी गोवंशीय प्राणी मिळून आले. अशा एकूण 37 गोवंशीय प्राण्यांची सुटका करण्यात आली.

ताब्यात घेतलेले सर्व गोवंश केज पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे गोशाळेत सोडण्यात आले. सकाळी 7 वाजता पोलिसांनी पंचनामा केला असून जनावरे नेमकी कुठून आणली होती आणि त्यांना कुठे नेले जात होते, याचा तपास केज पोलीस करत आहेत.

दरम्यान, बीड जिल्ह्यात गोवंश वाहतुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत असून अशा प्रकरणांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. या प्रकरणातही संबंधित आरोपींचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button