ब्रेकिंग न्यूज

लाच घेताना सहकारी अधिकाऱ्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात.

सावकारकीचे लायसनसाठी मागतिली लाच;जालना एसीबी पथकाची कारवाई;

माजलगाव(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यात लाचखोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी हे पैसे घेतल्याशिवाय कामच करत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे अशा लाचखोरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करत असून देखील लाचखोरीच्या प्रमाण काही कमी होताना दिसत नाही.

माजलगाव येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील सहाय्यक निबंधक सूरज जगदाळे आणि सहकार अधिकारी श्रेणी-२ सतीश शेरखाने यांना १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहात पकडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडून सावकारी परवाना (लायसन्स) मंजूर करून देण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांनी १३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर जालना एसीबीचे उपअधीक्षक (डीवायएसपी) जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. त्यानुसार, मंगळवारी (३० जून) दुपारी सुमारे २.३० वाजता लाचेची रक्कम स्वीकारताना दोन्ही अधिकाऱ्यासह एक. खाजगी फफाळ नामक व्यक्तीला रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

कारवाईनंतर तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात अलीकडच्या काळात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सातत्याने कारवाया केल्या जात असल्या, तरी अशा घटनांमध्ये अपेक्षित घट होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.सुरु आह.

ही कामगीरी श्रीमती माधुरी केदार कांगणे, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर, मा. श्री. शशिकांत सिंगारे, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक बी.एस. जाधवर यांनी व पथकातील पोहेकॉ/गजानन घायवट पोअं./गणेश चेके, मनोहर भुतेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांनी केली,

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button