पैशाच्या व्यवहारातून महिलेला शिवीगाळ.
रात्री घरी येऊन"पतीला जीवे मारण्याची धमकी" पेठ बीड पोलिसांत तक्रार दाखल.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैशांच्या व्यवहारातून एका महिलेच्या घरी जाऊन शिवीगाळ करत तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध अदखलपात्र (NCR) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शीनाका,ढगे कॉलनी येथील रहिवासी कविता बालाजी पवार (वय 28) यांनी याबाबत पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, 29 जून 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजता शैलेश गिरी व गणेश गिरी (दोघे रा. माळेगल्ली, बीड) हे त्यांच्या घरासमोर आले. पतीसोबत असलेल्या पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरून त्यांनी “तुझे पती कुठे आहेत?” अशी विचारणा करत शिवीगाळ केली.
तसेच, “तुझे पती बाहेर भेटले की जीवे मारतो,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात एनसीआर क्रमांक 379/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 351(2) व 3(5) अंतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. बीड शहरात खासदार खाजगी सावकारकीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून दहा टक्के महिना तर काही सावकार रोजाने पैसे देत असल्याचे माहिती मिळत आहे. ही शिवीगाळ व धमकी सावकारकीच्या प्रकरणातून घडली अशी चर्चा बार्शी नाका भागात नागरिकात होती.







