ब्रेकिंग न्यूज
नगरसेवक अशफाक इनामदार यांना पितृशोक.
हाजी इसाक साहब यांचे 82 व्यावर्षी निधन;आज रात्री ९ वाजता दफनविधी.

बीड (प्रतिनिधी) – बीड शहरातील जेष्ठ नगरसेवक अशफाक इनामदार व आवेज इनामदार यांचे वडील हाजी इसाक साहब यांचे आज सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
हाजी इसाक साहब हे बीड शहरातील झमझम कॉलनी येथील रहिवासी होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांचा जनाजा नमाज आज मंगळवार रात्री ९ वाजता तकिया मस्जीद येथे अदा करण्यात येणार असून, त्यानंतर तकिया कब्रस्तान येथे दफनविधी पार पडणार आहे.इसाक इनामदार यांचे मृत्यू समयी वय 82 होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं व तीन मुली असा परिवार आहे.
इनामदार कुटुंबियांच्या दुःखात दैनिक पार्श्वभूमी परिवाराने सहभाग नोंदवून श्रद्धांजली अर्पण केली आहे.





