ब्रेकिंग न्यूज

भरधाव पिकअपच्या धडकेत बीड मधील तरुणाचा मृत्यू.

केज/अंबाजोगाई रस्त्यावर दुर्दैवी अपघात;उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली.

बीड (प्रतिनिधी)बीड केज–अंबाजोगाई रस्त्यावर भरधाव पिकअपच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

मृत तरुणाचे नाव राजेश विजय पवार (वय 24, रा. बार्शी नाका, बीड) असे आहे. तो दगड फोडण्याच्या काम बीडमध्ये करत होता परंतु बीडमध्ये कामे असल्याने तो सध्या कामासाठी आपल्या मेहुण्याकडे केज येथे गेला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 25 एप्रिल रोजी कामावरून घरी जातं असताना रात्री आठ वाजण्याचा सुमारास तो रस्त्यावरून पायी जात असताना भरधाव मालवाहू पिकअपने राजेशला जोरदार धडक दिली.जोराच्या धडकेत राजेश रस्त्याच्या बाजूला उडून पडला  या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.

अपघातानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने उपचार सुरू असतानाच दिनांक 27 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

राजेश पवार हा अत्यंत कष्टाळू तरुण होता, कुटुंबाचा आधार होता त्याच्या अपघाती निधनाणे कुटूंबाला धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे,पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजेश पवार यांच्यावर दिनांक 28 एप्रिल मंगळवार रोजी दुपारी एक वाजता बीड मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 अपघाताबाबत पुढील तपास केज पोलीस करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button