ब्रेकिंग न्यूज

माने कॉम्प्लेक्स परिसरात गॅस सिलिंडरला भीषण आग.

अग्निशामक दलाने तत्काळ आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. 

बीड (प्रतिनिधी) दिनांक 20 एप्रिल सोमवार रोजी सकाळी 12:30 वाजता बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात नागारगोजे यांच्या निवासस्थानी राहणारे किरायदार भारत माने यांच्या घरातील गॅस सिलिंडरला अचानक भीषण आग लागल्याने या आगीमध्ये माने यांचे हात भाजल्याने तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आगीमुळे माने कॉम्प्लेक्स परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. क्षणाक्षणाला वाढणाऱ्या आगीमुळे परिस्थिती गंभीर बनली होती आणि जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला होता.

या घटनेची माहिती अग्निशामक दलाला या भागातील नगरसेवक आदित्य (सनी) माने यांनी तत्काळ अग्निशामक दलाशी संपर्क साधत कोणताही विलंब न करता स्वतः घटनास्थळी धाव घेतली.

धगधगत्या आगीसमोर उभे राहत, जीवाची पर्वा न करता अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले व घरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि अनेकांचे प्राण वाचले.

तसेच, घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची प्रकृती जाणून घेण्यासाठी नगरसेवक माने यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट देत विचारपूस केली.

या संपूर्ण घटनेत अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनीही वेगाने प्रतिसाद देत आग विझवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या पथकात सीनियर फायरमन आदमाने, कानतोडे, फायरमन राठोड तसेच वाहन चालक कपाळे आणि ओव्हाळ यांचा समावेश होता.

 अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्ना व या भागातील नगरसेवक आदित्य माने यांच्या कार्यतत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून नागरिकांकडून अग्निशामक दलाल कर्मचारी व नगरसेवकाचे कौतुक केले जात आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button