अंबाजोगाई तालुक्यातील मतदान केंद्रावर दि. ३० आणि ३१ मार्च रोजी विशेष शिबीर घेण्यात येत आहे.
पुनर्निरीक्षण पूर्वतयारी साठी


*अंबाजोगाई तालुक्यात विशेष पुनरिक्षण पुर्वतयारीसाठी दिनांक 30/03/2026 व 31/03/2026 रोजी मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे (कॅम्प) आयोजन*
अंबाजोगाई- प्रतिनिधी:–
अंबाजोगाई तालुक्यामध्ये एकूण 236005 इतके मतदार असून ते 232 केज विधान सभा मतदार संघ व 233 परळी मतदार संघ यामध्ये विभागलेले आहेत.
या मतदारापैकी तालुक्याचे काम 72.35% मतदार मॅपींगचे काम आजपर्यंत पुर्ण झाले आहे. उर्वरीत मॅपिंग पुर्ण होणेकरिता सर्व मतदान केंद्रावर दिनांक 30/03/2026 व 31/03/2026 रोजी मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे (कॅम्प) आयोजन करण्यात आले आहे.
ज्या मतदारांचे नाव मॅपिंग झालेले नाही अशा मतदारांची वेगळी यादी करून त्या मतदारांची माहीती कॅम्पमध्ये घेउन सदरची प्रक्रीय पुर्ण करण्याचे सर्व मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे.
ज्या मतदारांची मॅपिंग झालेली नाही अशा मतदारांनी संबधित बीएलओ यांना पुढील माहीती दयावी.
अंबाजोगाई तालुक्यातील सदय स्थिती
अंबाजोगाई तालुक्यात एकूण मतदार :- 2,36,005
एकूण मतदान केंद्रस्तरीय अधिकारी :- 250
एकूण पर्यवेक्षक :- 25
232 केज विधानसभा मतदान केंद्रे :- 145
233 परळी विधानसभा मतदान केंद्रे:- 105
अ.क्र. तपशिल
1 टेबल टॉप वर्क
(ऑनलाईन मॅपिंगची पूर्वतयारी) आपल्या आजच्या मतदार यादी मधील नावे 2005 च्या यादीमध्ये आहेत का ते तपासून दिलेल्या नमुन्यात लिहावेत.
म्हणजेच ही माहीती दिलेल्या नमुन्या मध्ये मॅन्युअली मॅपिंग करून घ्यावी.
2 वन टू वन मॅपींग आपल्याला दिलेल्या 2024 च्या रंगीत मतदार यादी मधील नावे जी 2005 यादीमध्ये आहेत ती मॅपिंग करून घेणे.
3 प्रोजेनी (वंश) – 1 ज्या मतदाराचे नाव आजच्या यादीत 40 पेक्षा कमी आहे त्यांचे आई-वडील यांची नावे शोधून त्यांच्या मॅपींग करून घेणे.
4 प्रोजेनी (वंश) – 2 ज्या मतदारांचे नात व नातू मतदार यादीत असतील तर वरील प्रमाणे मुददा क्रमांक 01 व 02 खात्री करून मॅपिंग करावे.
5 उर्वरित मॅपींग राहीलेले मतदार 1. कुटुंब :- दुसरी कडून आपल्याकडे स्थलांतरित झालेले त्याचे तिकडचे 2002 / 2005 च्या यादीतील माहिती अन्वये मॅपिंग करावी.
2. सुन :- लग्न होउन आपल्या यादीत समाविष्ट झालेले त्यांचे वरील प्रमाणे माहिती आधारे मॅपिंग करावे असे सहाययक मतदान अधिकारी आणि तहसीलदार अंबाजोगाई यांच्या कडून कळविण्यात आले आहे.






