ब्रेकिंग न्यूज

स्कूटीतून दारू वाहतूक करणारा पोलिसांच्या ताब्यात.

लाखाच्या मुद्देमाला सह एक आरोपी ताब्यात पेठ बीड पोलिसांची धडक कारवाई

बीड (प्रतिनिधी) अवैध दारू विक्री व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पेठ बीड पोलिसांनी प्रभावी कारवाई करत एका आरोपीस अटक केली आहे.

     दिनांक 25 मार्च 2025 रोजी सकाळी 11.00 वाजण्याच्या सुमारास, सचिन विठ्ठल वादे (वय 38, रा. नालवंडी ता. जि. बीड) हा आपल्या टीव्हीएस इलेक्ट्रिक स्कुटी (क्र. MH-23-BM-4836) वरून विनापरवाना विदेशी दारू विक्रीसाठी वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पेठ बीड पोलीस ठाण्याच्या पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सापळा रचून कारवाई केली. या रेडमध्ये आरोपीच्या ताब्यातून एकूण 1,17,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अजित (बकल नं. 1835) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अजित, विष्णु, पांडुरंग, अल्ताफ व गिरी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

अवैध धंद्यांविरोधात पेठ बीड पोलिसांच्या कारवाया सरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button