कॅन-बाटलीत पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी;नियम मोडल्यास कडक कारवाई
बीडमध्ये बॉटल,कॅन मध्ये खुलेआम पेट्रोल,डिझेल विक्री;नियम मोडल्यास कडक कारवाई.

बीड (प्रतिनिधी) आखाती देशांतील सुरू असलेल्या युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसत आहेत.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेलसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात दिसत आहे. या परिस्थितीत काही ग्राहक इंधनाचा साठा करण्याच्या उद्देशाने कॅन व बाटल्यांमध्ये पेट्रोल-डिझेल भरून घेत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. बीड शहरात कालपासूनच इंधन संपल्याच्या अफवा पसरल्याने जवळपास सर्वच पेट्रोल पंपावर वाहणाच्या रांगा लावल्या होत्या तर काही पंप चालकानी इंधनाचा तुटवडा व गर्दीमुळे पंप बंद केले होते
या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी महत्त्वाचे परिपत्रक जारी करत सर्व पेट्रोल पंप चालकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही ग्राहकाला कॅन किंवा बाटलीमध्ये पेट्रोल-डिझेल देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
जर कोणत्याही पेट्रोल पंपावरून अशा प्रकारे इंधन विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर शासन नियमांनुसार सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, नागरिकांनीही घाबरून इंधनाचा साठा न करता आवश्यकतेनुसारच खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.






