ब्रेकिंग न्यूज

परळीत घराला भीषण आग.

आगीत बंगला जळून खाक.

बीड, दि. १५ (प्रतिनिधी) : परळी शहरातील गिते पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या विद्यानगर भागात रविवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत परळीतील प्रतिष्ठित नागरिक अरुण टाक यांचा बंगला पूर्णपणे जळून खाक झाला.

प्राथमिक माहितीनुसार आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. घटनास्थळ पेट्रोल पंपाच्या अगदी जवळ असल्याने परिसरात मोठी भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आगीचे प्रचंड लोट दूरवरूनही दिसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी आणि ती इतर ठिकाणी पसरण्यापासून रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले.

या आगीत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button