ब्रेकिंग न्यूज

गळा चिरून हत्या.

बीड जिल्हा पुन्हा हदरला;खुणाचे सत्र सुरूच.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पुन्हा एकदा रक्ताचा थरार पाहायला मिळाला आहे. हनुमंत पिंपरी शिवारात एका २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी (दि.३१) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्की उर्फ आण्णा रावसाहेब चंदनशिव (वय २५ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. केवड आणि हनुमंत पिंपरीच्या शिवारात विक्कीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. अज्ञात हल्खोराने विक्कीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. जखम खोल असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.घटनेची माहिती मिळताच केज पोलीस दलासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटेश देशपांडे, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व महेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, इनामदार आणि अशोक सोनवणे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास वेगाने सुरू केला आहे.या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत महेश चंदनशिव नावाच्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. हा खून जुन्या वादातून झाला की अन्य काही कारणातून, याचा तपास पोलीस करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button