ब्रेकिंग न्यूज

१४ वर्षाच्या मुलीचा बालविवाह रोखला.  

AHTU टीमने मुलीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल.

बीड (प्रतिनिधी )बीड, दिनांक १९/०१/२०२६ सोमवारी सकाळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी, पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दिनांक ०५/०१/२०२६ रोजी आम्ला ता. गेवराई जि. बीड येथे एका १४ वर्षाच्या मुलीचा बालविवाह झाला आहे व तिथेच आज सत्यनारायणाची पूजा आहे. त्यावरून, AHTU टीम अम्ला गावात दाखल झाली. मिळालेल्या माहितीनुसार बालविवाह झालेल्या घरी टीम गेली असता, पोलीस आल्याचे बघून सर्व पाहुण्यांनी इकडे तिकडे सैरा वैरा पळू लागले. व मुलीला कुठेतरी लपवून ठेवले. PSI पल्लवी जाधव यांनी मुलीचा घरात व इतरत्र शोध घेतला पण ती मिळून आली नाही. इथे बालविवाह झालाच नाही असा घरातल्या लोकांनी बनाव केला. विवाह झालेला व्यक्ती पळ काढेल तोच त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता इथे काही झालेच नाही किंवा मी तो व्यक्ती नाहीच अस तो दाखवत होता. परंतु PSI पल्लवी जाधव यांच्याकडे लग्न झाल्याचा पुरावा असल्याबाबत सांगितले व लग्नाचा फोटो माझ्याकडे आहे असे सांगितले. मग त्याने घाबरून कबुली दिली. सदर व्यक्तीचे नाव कृष्णा उर्फ बबन अनुरुद्र वरबडे वय ३० वर्ष रा. आम्ला ता. गेवराई जि. बीड असे सांगितले. तसेच पिडीत मुलगी ही १४ वर्षाची असून माझ्या मामाची मुलगी आहे असे सांगितले. सुमारे एक तासानंतर मुलीला PSI पल्लवी जाधव यांच्या समक्ष हजर केले. सदर मुलगी खूप घाबरलेली होती . तिला जवळ घेवून, विश्वासात घेवून तिची विचारपूस केली. व तिचे समुपदेशन केले. त्यांनतर PSI पल्लवी जाधव यांनी गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना cal करून घटनास्थळी बोलावून घेतले व त्यांना घडलेली सर्व हकीगत सांगितली. तसेच त्यांनी तिथे हजर असलेल्या सर्व नातेवाईक मंडळी व गावातील नागरिकांना बालविवाह कायदा व बालविवाहाचे मुलींवर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत माहिती देवून जनजागृतीपर मार्गदर्शन केले. त्यानंतर सदर पीडित मुलगी व बालविवाह करणारा कृष्णा उर्फ बबन वरबडे तसेच त्याचे आई वडील यांना ताब्यात घेवून, पुढील कारवाई साठी पोस्टे ला हजर केले व मुलीचे आई वडील यांना फोन करून पोस्टे ला हजर राहण्यास सांगितले . ग्रामसेवक यांना बालविवाह झालेबाबत गुन्हा दाखल करण्यास सांगितले. तसेच पोस्टेच्या महिला अंमलदारांना पीडित मुलीला तिच्या आईवडिलांसोबत बालकल्याण समिती समोर हजर करणेबाबत सूचना दिल्या.

       सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, PSI पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, प्रदीप येवले, अशोक शिंदे , पोशी योगेश निर्धार सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष बीड यांनी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button