ब्रेकिंग न्यूज

हळदीकुंकू कार्यक्रमांसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना चैन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे खबरदारी आवश्यक.

PAI वर्षा व्हगाडे यांनी महिलांना काय आवाहन केले पहा !

बीड (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यात सध्या चैन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने हळदीकुंकू व संक्रांतीनिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांनी विशेष सतर्क राहावे, असे आवाहन बीड पोलिसांकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर PAI वर्षा व्हगाडे यांनी महिलांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

संक्रांतीनंतर हळदीकुंकू कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात महिला बाहेर पडत असल्याने चोरट्यांकडून संधी साधली जात असल्याचे पोलिसांनी निदर्शनास आणून दिले. महिलांनी अनोळखी व्यक्तींनी पत्ता, माहिती किंवा अन्य कारणाने संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यास सावध राहावे. तसेच शक्यतो एकट्याने कार्यक्रमाला न जाता घोळक्याने जावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

कार्यक्रमस्थळी ये-जा करताना एखाद्या दुचाकीवरून संशयित व्यक्ती दोन-तीन वेळा चकरा मारताना दिसल्यास त्वरित धोका ओळखून पोलिस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क साधून माहिती द्यावी, असेही PAI व्हगाडे यांनी स्पष्ट केले.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस सतर्क असून नागरिकांनीही जागरूक राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button