प्रभाग क्रमांक २६ संजू(भाऊ)उडाण,चक्रेसाठी लाडक्या बहिणींचा”डोअर टू डोअर” प्रचार.
हक्काचा व कामाचा माणूस म्हणून संजय उडान यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा.

बीड दि २८ (प्रतिनिधी)- बीड शहरातील प्रभाग क्रमांक २६ मध्ये लोकप्रिय नगरसेवक संजय जनार्दन उडाण यांना नागरिकांकडून वाढता पाठिंबा मिळत असून, प्रभागातील केलेल्या दर्जेदार विकासकामांचीच ही थेट पावती असल्याचे स्पष्ट होत आहे. संजू भाऊ उडाणसाठी आता लाडक्या बहिणी डोअर टू डोअर प्रचार करत असून दोन्ही उमेदवारांना वाढती पसंती मिळत आहे.
गेल्या पाच वर्षांत संजय उडाण यांनी प्रभागाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला. बार्शी नाका परिसरात यापूर्वी चालण्यालाही रस्ता नसलेली परिस्थिती होती. मात्र शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून या संपूर्ण परिसरात उच्च दर्जाच्या साहित्याचा वापर करून सिमेंट रस्ते, नाल्या व पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या.
बार्शी नाका चौक – इमामपूर रोड ढोले वस्ती ढगे कॉलनी – जे.के.कॉम्प्लेक्स या सर्व ठिकाणी झालेली कामे आजही मजबूत आणि टिकाऊ असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. बार्शी रोड ते जे.के. कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील रस्त्याचे कामही दर्जेदार असल्याची प्रशंसा होत आहे.
उच्च दर्जाची पाईपलाईन व घराघरात पाणी प्रभागात नवीन पाईपलाईन टाकून प्रत्येक घरात नळजोडणी देण्यात आली. संजय उडाण व शितलताई चक्रे सध्या डोअर-टू-डोअर संपर्क मोहीम राबवत असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विकास पाहिला आहे, म्हणून पुन्हा संजू भाऊ उडाण यांनाच संधी असा निर्धार मतदारांनी व्यक्त केल्याने प्रभाग २६ मधून उडाण-चक्रे यांना जोरदार पसंती मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.








