खासबागमध्ये AIMIM ची दमदार सभा होणार;बीडचे राजकारण तापले.
AIMIM मैदानात उतरल्याने राजकीय पक्षांची गणित बिघडली.

मोमीनपूरा मध्ये एम आय एम च्या सभेला मिळाला होता उत्सुर्फ प्रतिसाद.
बीड (प्रतिनिधी)आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासबाग परिसरात AIMIM ची भव्य सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेमुळे बीडमधील राजकीय वातावरण तापू लागले असून राजकीय पक्षांची गणिते बिघडल्याचे दिसत आहे.
AIMIM च्या नियोजनबद्ध व आक्रमक मोर्चेबांधणीमुळे इतर राजकीय पक्षांची हवा गुल झाल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत मोमीनपुरा भागात सभेची आयोजन केले होते; या सभेला नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. नागरिकांची उपस्थिती पाहता राजकीय पक्षांना याची धडकी भरल्याचे चर्चा बीड शहरातरंगली होती.
दिनांक 31 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता बीड शहरातील खासबाग मध्ये होणाऱ्या सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोहम्मद माजेद हुसेन यांची उपस्थित राहणार आहेत.
AIMIM कार्यकर्त्यांत उत्साहाचा जोर.
29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता अडत मार्केट रोड, खासबाग येथे होणाऱ्या या सभेस AIMIM चे प्रभावी आणि दमदार नेते, हैदराबादच्या नामपल्ली मतदारसंघाचे आमदार मोहम्मद माजेद हुसेन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
2023 च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवत त्यांनी AIMIM ला नवसंजीवनी दिली होती. त्यांच्या आक्रमक भूमिका आणि अचूक राजकीय भाषण शैलीमुळे बीडमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट आहे.
निवडणूक तयारीत AIMIM ची मजबूत पावले : नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा बिगुल ही सभा AIMIM च्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आली असून, यामुळे नगरपरिषद निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता वाढली आहे.
सभेच्या तयारीला जोरदार वेग आला असून, बॅनर, पोस्टर आणि संघटनात्मक बैठकींद्वारे AIMIM ची रणनीती अधिक आक्रमक होताना दिसत आहे.
सभेला विक्रमी प्रतिसादाची अपेक्षा;शहरभर उत्सुकता — मतदारांचे लक्ष AIMIM कडे.
AIMIM च्या या सभेबाबत बीडमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक नागरिक सभेला ऐतिहासिक प्रतिसाद मिळेल असा अंदाज व्यक्त करत आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या सभेनंतर बीडमधील प्रचाराचे वातावरण पूर्णपणे बदलू शकते.
AIMIM जिल्हाध्यक्ष शफिक भाऊ यांनी दिले आवाहन :
या सभेला बीड शहरातील सर्व मतदार, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन AIMIM बीड जिल्हाध्यक्ष शफिक भाऊ यांनी केले आहे. या सभेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.








