ब्रेकिंग न्यूज

अंमबाजोगाईच्या विकासासाठी डॉक्टरांशी आमदार नमिता मुंदडा यांचा महत्वपूर्ण संवाद

शहरपरिवर्तन जनविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोरजी मुंदडा यांनाच मतदान करण्याचे आवाहन.

 


नगरपालिका निवडणूक २०२५ …

*अंबाजोगाईच्या विकासासाठी डॉक्टरांशी आ. नमिता मुंदडा यांचा महत्वपूर्ण संवाद,शहरपरिवर्तन जनविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोरजी मुंदडा यांना मतदान करण्याचे आवाहन*
अंबाजोगाई- प्रतिनिधी :–
दि २७ रोजी आगामी अंबाजोगाई नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरविकास,प्रगतीसाठी आपली भूमिका स्पष्ट करून शहरातील डॉक्टरांशी संवाद साधला. नंदकिशोर मुंदडा हे हि यावेळी उपस्थित होते. आरोग्य ,विकास,आणि काकजींची बांधिलकी या बैठकी दरम्यान मांडण्यात आली. अंबाजोगाईच्या भविष्यातील विकास योजना विशेषतः सद्याच्या समस्या आणि त्यांचे निवारण यासाठी शहर परिवर्तन विकास आघाडीची सर्वसमावेशक भूमिका यावर सविस्तरपणे चर्चा झाली.यामध्ये आरोग्यसेवा सुधारणे अधिक सक्षम वैद्यकीय आणि आरोग्यसेवा पुरवणे ,स्वछता व पायाभूत सुविधांचा विकास करणे,सक्षम प्रशासनातून नागरिकांचे समस्या त्वरित सोडवणे या साठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणा उभरने असे विविध मुद्दे होते. या वेळी सर्व डॉक्टर बंधू भगिनी यांनी नंदकिशोरजी मुंदडा यांच्यावर विश्वास व्यक्त करून या निवडणुकीत छत्रीलाच मतदान करून विकासाच्या कार्यात हातभार लावू असा विश्वास हि दिला.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button