ब्रेकिंग न्यूज

पुन्हा नवगण राजुरीत गुटखा साठ्यावर करवाई; २.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

बीड पोलिस गुटखा माफियाच्या"मुळावर"घाव कधी घालणार ?

बीड (प्रतिनिधी) दोन दिवसांपूर्वीच बीड स्थानिक गुन्हे शाखेने नवगण राजुरी मध्ये गुटखा साठा जप्त केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा बीड ग्रामीण पोलिसांनी नवगण राजुरी परिसरात अवैध गुटखा विक्री विरोधात मोठी कारवाई करत सुमारे 2 लाख 19 हजार 270 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. यामुळे 90 राजुरी गुटख्याचे “हॉटस्पॉट”आहे का?असा प्रश्न पडला आहे.या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.50 वाजण्याच्या सुमारास पोउपनि संजय कुकलारे, पोह/मनोज जोगदंड, पोह/फिरोज पठाण, पोह/सोमनाथ जायभाये व पोअ/सचिन कापसे हे नवगण राजुरी परिसरात पेट्रोलिंग करत असताना खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार तांबोळी गल्ली येथे छापा टाकण्यात आला.

यावेळी रज्जाक गणीभाई तांबोळी (रा. नवगण राजुरी, जि. बीड) याच्या ताब्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले विविध प्रकारचे गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. यात केसरयुक्त पानमसाला, विविध ब्रँडचे तंबाखू, जर्दा व सुगंधित पानमसाल्यांचा समावेश असून एकूण मुद्देमालाची किंमत 2,19,270 रुपये इतकी आहे.

सदर माल विनापरवाना बेकायदेशीररित्या साठवून विक्रीसाठी ठेवलेला असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नं. 135/2026 अंतर्गत भा.न्या. संहिता 2023 मधील कलम 123, 223, 274, 275 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोह/फिरोज अब्दुल रौफ पठाण यांनी फिर्याद दिली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वेकंटराम यांचे मार्गदर्शनाखाली पोननि सोमनाथ जाधव, सपोनि बाळराजे दराडे, पोउपनि संजय कुकलारे, पोह/मनोज जोगदंड, पोह/फिरोज पठाण, पोअ/सोमनाथ जायभाये, पोअ/सचिन कापसे यांनी केली. यापुढेही पोलीस ठाणे बीड ग्रामीण हद्दीत चोरुन लपुन चालणारे अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.

 बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस गुटखा विक्री होत असून गुटखा माफियाच्या “मुळावर” घाव घालावा तरच बीड मधील गुटखा विक्रीवर आळा बसेल.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button