बीड पोलीसांकडून धडधडणार्या,जाळ निघणाऱ्या सायलेन्सरचा खेळ खल्लास!
ठो ठो आवाज व जाळ निघणाऱ्या बुलेट वाहनधारकांना दिला दणका.

बीड( प्रतिनिधी)बीड शहरात बुलेट मोटारसायकलच्या सायलेन्सरमधून होणार्या कर्णकर्कश आवाजाविरोधात पोलिसांनी आता जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक पवित्रा घेतला आहे. रस्त्यावर धुमाकूळ घालत नागरिकांची झोप उडवणार्या आणि कायद्याची पायमल्ली करणार्या वाहनधारकांवर विशेष दंडात्मक मोहीम राबवत पोलिसांनी नियम मोडणार्यांचे सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे यावेळी नव्याने रुजु झालेले वाहतुक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीपकुमार खेडकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, पोलीस हवालदार अजिनाथ मुंडे, पोलीस चालक संतोष हारके, पोलीस हवालदार राहुल गायकवाड, पोलीस अंमलदार मोहन बनसोडे, संतोष मोरे, शेषनारायण गाडे, पोलीस चालक अंमलदार नारायण वाघमारे उपस्थित होते.
सदरील कारवाई ही अंबिका चौक व माने कॉम्प्लेक्स या ठिकाणी करण्यात आली. ज्यामध्ये एकुण 15 बुलेटचे सायलेन्सर जप्त करण्यात आले. तसेच फॅन्सी नंबरप्लेटवर देखील कारवाई करण्यात आली. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे ही मोहीम सातत्याने चालू राहील जे सायलेन्सर मोडीफाय करुन लावले असतील ते तात्काळ बदलून मुळ कंपनीचे सायलेन्सर लावण्यात यावे. रस्त्यावर स्टंटबाजी करणार्या तसेच विशेषतः कॉलेज, क्लासेस, रहदारीच्या ठिकाणी मुद्दामहून होणार्या वाहनांच्या आवाजाचा त्रास आणि कायद्याचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. नियम मोडाल, तर थेट मोठी कारवाई होईल असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाकडून होणार्या या कारवाईमुळे शहरात शिस्त प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असून, नागरिकांनीही या मोहिमेचे स्वागत केले आहे तसेच समाधान व्यक्त होत आहे. 2
सायलेन्सरचा दहशतवाद संपवणार-जिल्हा वाहतुक शाखा.
शहरात बुलेटसह इतर दुचाकींवर लावण्यात येणार्या कर्णकर्कश सायलेन्सरविरोधात पोलीसांनी कडक भूमिका घेतली असून नागरिकांना त्रास देणार्या आणि वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांवर विशेष मोहीम राबवून अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करुन सायलेन्सरच्या आवाजाचा दहशतवाद संपवणार असल्याचे जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी दिलीपकुमार खेडकर यांनी सांगितले.
ही करवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक खेडकर, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.






