नदीपात्रातील अवैध वाळू उपसावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
दहा लाखाचा मुद्देमाल जप्त,दोघांवर गुन्हा दाखल.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत दोन ट्रॅक्टरसह मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलाव झाल्यानंतर काही ठिकाणी चोरट्या मार्गाने विनापरवाना व विनारॉयल्टी वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. महसूल विभाग आणि स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा देखील सुरू आहे.
दरम्यान, दि. २४ फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन गेवराई हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की खामगाव शिवारात नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.
छाप्यात दोन ट्रॅक्टर आणि दोन केन्या आढळून आल्या. घटनास्थळी ट्रॅक्टर चालवणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बांतेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI श्रीराम खटावकर, राहुल शिंदे,अर्जुन यादव, अश्फाक सय्यद,मनोज परजने आणि नितीन वडमारे यांचा सहभाग होता.










