सरपंच पतीचा दिली गावाकऱ्यांना धमकी.
"माझं बिल निघेपर्यंत गावाला पाणी नाही”ग्रामसभेत सरपंच पतीचे वादग्रस्त विधान..

बीड (प्रतिनिधी )बीड तालुक्यातील अंतरवन पिंपरी तांडा (ता.बीड जि.बीड) जलजीवन मिशन अंतर्गत अंतरवन पिंपरी तांडा गावासाठी १ कोटी १४ लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. ही योजना सुमारे पाच महिन्यांपूर्वी पूर्ण झाली असतानाही गावकऱ्यांना अद्याप नियमित पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
याचे कारण म्हणजे सरपंच पतीने घेतलेला वादग्रस्त आणि आक्षेपार्ह पवित्रा.
“जोपर्यंत माझे बिल निघत नाही, तोपर्यंत गावाला पाणी देणार नाही,” अशी उघड धमकी सरपंच पतीने ग्रामसभेत दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
ग्रामसभेदरम्यान सरपंच पतीचे वादग्रस्त विधान.
“माझे पैसे निघाले नाहीत तर मी पाणी सोडणार नाही. गावाला प्यायला द्यायचे असेल तर द्या,” असे म्हणत उपस्थित ग्रामस्थांना धमकावल्याचे सांगितले जाते. या वक्तव्यामुळे ग्रामसभेत प्रचंड संतापाची लाट उसळली.
कोट्यवधी रुपये खर्च करून तयार झालेली पाणीपुरवठा योजना वैयक्तिक आर्थिक वादामुळे अडवून ठेवणे हे लोकशाही मूल्यांना व प्रशासनाला थेट आव्हान असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत जिल्हा प्रशासन, पंचायत समिती व संबंधित यंत्रणांनी तात्काळ दखल घेऊन करवाई करणार का? असा प्रश्न गावाकऱ्यांना पडला आहे. गावकऱ्यांना त्वरित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.










