त्या कत्तलखान्याच्या स्थलांतरासाठी डॉ.सारिकाताई क्षीरसागर आक्रमक.
कत्तलखान्यावरून सभागृहात खडाजंगी; काही नगरसेवकांचा विरोध.

बीड (प्रतिनिधी)बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासासह विविध नागरिकांच्या समस्यांवर गेल्या दोन दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक विषयांवर नगरसेवक आणि गटनेत्यांमध्ये खडाजंगी होत असतानाच आज भाजपच्या गटनेत्या डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी शहरातील कत्तलखान्याचा प्रश्न आक्रमकपणे सभागृहात उपस्थित केला.
बार्शी नाका परिसरासह शहरातील नागरिकांना कत्तलखान्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याचे सांगत, कत्तल केलेल्या जनावरांचे मांस व इतर अवयव हे बिंदूसरा नदीपात्रात टाकत असल्याचा आरोप करत यामुळे बार्शी नाका ते बाजार तळापर्यंत दुर्गंधी पसरत असून यामुळे विविध रोग होण्याची देखील शक्यता नाकारता येत नसल्याने सांगितले तसेच त्या कत्तलखान्यापासून दोन मंदिरे देखील असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत तात्काळ हा कत्तलखाना बंद करून स्थलांतरित करावा अशी मागणी जोरदार मागणी करत कत्तलखाना बीड शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. या विषयावर काही नगरसेवकांनी विरोध दर्शवला असला, तरी नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे स्पष्ट करत डॉ. क्षीरसागर आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या.
सभागृहात बोलताना त्यांनी नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण या मुद्द्यांना प्राधान्य देत प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. शहरातील वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कत्तलखाना शहराबाहेर असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. सारिकाताई क्षीरसागर या गेल्या काही दिवसांपासून नगरपालिकेच्या सभागृहात विविध लोकहिताच्या प्रश्नांवर तसेच शहरातील आलेले निधी बाबत विकास कामे होत नसल्याने आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. कत्तलखान्याच्या स्थलांतराची त्यांनी केलेली मागणी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याची चर्चा शहरात सुरू असून, त्यांच्या या भूमिकेचे शहरातील विविध सामाजिक संघटनातून व शहरवासीयातून स्वागत होत आहे.









