ब्रेकिंग न्यूज

बीडमध्ये पुन्हा गोळीबार ?

दोन्ही गटाचा एकमेकांवर फायरिंगचा आरोप ;चारचाकी गाडी फोडली,पोलिसांकडून चौकशी सुरु.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरात पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची चर्चा रंगली आहे. सोमवारी (दि. 29 जून) मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर पुढे मोठ्या संघर्षात झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये जाधव व कंडेरे यांच्यात वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून त्यानंतर नगर रोडवरील चराटा फाटा चौकात जाधव व कंडेरे यांच्यात पुन्हा बाचाबाची होऊन यात चारचाकी वाहनाची तोडफोड झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाणे निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना मिळाले असता तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला. 

दोन्ही गटांनी एकमेकांवर फायरिंग केल्याचा आरोप केल्याने त्या दोन्ही गटांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी थांबून घेतले असून सकाळी घडलेल्या प्रकार दिवसभर का तक्रार देण्यात आली नाही असा सवाल शिवाजीनगर पोलीस करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून बंदुकीच्या रिकाम्या पुंगळ्या सारखी एक वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली असून बंदुकीच्या गोळीच्या पुंगळ्या आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.

घटनेनंतर खंडेरे व जाधव या दोघांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. दरम्यान, चराटा फाटा परिसरात बंदुकीच्या रिकाम्या पुंगळ्या आढळल्याचीही माहिती समोर येत असून, त्यामुळे गोळीबाराच्या चर्चेला अधिक उधाण आले आहे. गोळीबार नेमका कोणी केला 

मात्र, या संपूर्ण प्रकरणाबाबत शिवाजीनगर पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे फायरिंग झाल्याचा दावा सध्या केवळ चर्चेच्या स्वरूपात असून, पोलिसांच्या तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला असून, शिवाजीनगर पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ पुढील तपास करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button