ब्रेकिंग न्यूज

मध्यस्थी केल्याने खून ! तीन तासांत खुनाचा उलगडा.

खुनातील आरोपी ताब्यात;बीड स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई.

बीड (प्रतिनिधी)वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील शरद आश्रुबा धनवे (वय 42) यांच्या खून प्रकरणाचा उलगडा बीड स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन तासांत करत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणी रणजित शेषेराव मस्के (वय 52, रा. पहाडी दहीफळ) यास अटक करण्यात आली आहे.

मयत शरद धनवे यांचा मुलगा आदित्य शरद धनवे (वय 20, रा. सोन्नाखोटा, ता. वडवणी) यांनी धारूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, काही दिवसांपूर्वी घडलेल्या कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. रंजित मस्के यांच्या मुलीने गोकुळ सांगळे याच्यासोबत पळून जाऊन विवाह केल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी शरद धनवे यांनी मध्यस्थी केली होती. याच कारणाचा राग चार आरोपींनी मनात धरून एका बंद खोलीमध्ये बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीतच धनवे याचा मृत्यू झाला.

मात्र रणजीत शेषराव मस्के यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती बीड स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व हाडाच्या डॉक्टरला संपर्क करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला व तो आरोपी बीड शासकीय रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयात जाऊन रणजित शेषेराव मस्के वय 52 रा.पहाडी दहिफळ या आरोपीला ताब्यात घेतले.

दि. 11 जून रोजी शरद धनवे यांना “पार्टी देण्याच्या” बहाण्याने रुई फाटा येथून पहाडी दहीफळ येथे नेण्यात आले. त्यानंतर त्यांचा खून झाल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली.

 आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व शवविच्छेदन करणार नाही अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती.सुरुवातीला प्रकरण गुंतागुंतीचे वाटत असताना बीड स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या तीन तासांत आरोपीपर्यंत पोहोचत रणजित शेषेराव मस्के यास ताब्यात घेतले. आरोपी ताब्यात घेतल्यानंतर कुटुंबीयांनी व  नातेवाईकांनी शवविच्छेदनास संमती दिल्याची माहिती आहे.

ही कारवाई बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पो.हे.कॉ.महेश जोगदंड,पो.हे.कॉ. बप्पासाहेब घोडके, पो.हे.कॉ.जफ्फर पठाण, पो.हे.कॉ.राहुल शिंदे तसेच चालक सुनील राठोड यांनी सहभाग घेतला.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button