चक्क ! PSI नवरदेवाने लग्नासाठी मागितला दहा लाख रुपये हुंडा व 20 तोळे सोन.
जरांगे पाटलाच्या गावातील घटना;तरुणीच्या कुटुंबाला धक्का;नवरदेवावर गुन्हा दाखल.

बीड प्रतिनिधी ) मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या मातोरी गावातील एका तरुणीचा विवाह नुकताच पोलीस निरीक्षक झालेल्या PSI सोबत ठरल, लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले होते, लग्नाची सर्व पूर्व तयारी झाली होती परंतु नवरदेवाने अचानकच लग्नासाठी दहा लाख रुपये हुंडा व वीस तोळे सोन्याची मागणी केल्याचा आरोप मुलींच्या कुटुंबीयांनी केला यामुळे मुलींच्या कुटुंबीयांना धक्का बसला, लग्नास नकार दिल्याने त्या पीएसआय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या प्रकरणात पीएसआय पवन निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात फसवणूक व बदनामीसंदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीच्या कुटुंबाने मुलीच्या लग्नासाठी मोठ्या उत्साहात तयारी केली होती. साखरपुडा, दागिने, कपडे तसेच लग्नाच्या विविध तयारीवर मोठा खर्च करण्यात आला होता. पोलीस खात्यातील अधिकारी जावई मिळणार असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, लग्न काही दिवसांवर आले असताना नवरदेवाने अचानक लग्नास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मुलीकडील कुटुंब समेटासाठी गेले असता लग्न करायचे असल्यास २० तोळे सोनं आणि १० लाख रुपये देण्याची अट घालण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मुलीकडील कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून त्यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, हुंडा देणे आणि घेणे हे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे, हे अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे. भारतात लागू असलेल्या हुंडाबंदी कायद्यानुसार विवाहासाठी पैशांची, सोन्याची किंवा इतर स्वरूपातील मागणी करणे बेकायदेशीर मानले जाते. विशेषतः कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पदावर असलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होणे अधिक गंभीर मानले जात आहे. मात्र, तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असून अधिकृत निष्कर्ष येणे बाकी आहे.
या घटनेमुळे समाजात अजूनही हुंड्यासारखी प्रथा जिवंत असल्याची चिंता व्यक्त होत असून, उच्चशिक्षित पोलिस अधिकाऱ्यांनी लग्नासाठी हुंडा व सोने याची मागणी केलेली आश्चर्य व्यक्त केले जात असून विवाह हा व्यवहार नसून परस्पर विश्वास आणि सन्मानाचे नाते असावे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटलांच्या गावातील व भावकीतील घटना असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.






