ब्रेकिंग न्यूज

धक्कादायक ! ब्लॅकमेलिंग करत महिलेवर बलात्कार.

पंचायत समिती माजी सभापतीच्या मुलाचा प्रताप ! गुंगीचे औषध देऊन बलात्कार;गुन्हा दाखल.

बीड (प्रतिनिधी )बीड जिल्ह्यातील पाटोदा पंचायत समिती माजी सभापतीचा मुलगा असलेल्या अमर किरण बांगर याने एका विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

बीड शहरातील चऱ्हाटा रोड भागात राहणाऱ्या आणि हल्ली शहादा जि नंदुरबार येथे वास्तव्यास असलेल्या महिलेवर अमर बांगर याने बीड व नंदुरबार येथे वारंवार बळजबरी केली. तक्रार देण्याचा प्रयत्न केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली.

आरोपी अमर बांगर हा पीडित महिलेला सातत्याने ब्लॅकमेल करत होता. एवढेच नव्हे तर, त्याने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केले.

या नराधमाचे कृत्य एवढ्यावरच थांबले नाही. त्याने पीडित महिलेला धमकावून तिच्याकडून आणि तिच्या कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी केली. कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून पीडितेच्या कुटुंबाने आरोपीला प्रचंड पैसा दिला, मात्र त्याचा छळ थांबला नाही. अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिसांत न्याय मागितला आहे.

आरोपी अमर बांगर हा बीड जिल्ह्यातील पाटोदा पंचायत समिती माजी पंचायत समिती सभापती चा मुलगा असल्याची माहिती समोर येत आहे. माजी सभापतींचा मुलगा असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाल्याची देखील माहिती मिळत आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार, खंडणी आणि गुंगीचे औषध देऊन शोषण करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. मात्र आरोपीच्या वडिलांची राजकीय पार्श्वभूमी पाहता पोलीस किती तत्परतेने कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button