ब्रेकिंग न्यूज

घरात घुसून कुटुंबावर हल्ला;दगडफेकीत एक जखमी

इथे राहू देणार नाही” म्हणत धमक्या;शिवानी गावातील घटना.

बीड (प्रतिनिधी)बीड तालुक्यातील शिवणी येथे किरकोळ कारणावरून एका कुटुंबावर घरात घुसून दगडफेक व मारहाण झाल्याची गंभीर घटना दिनांक 10 मे रविवारी रोजी सायंकाळी घडली.

या हल्ल्यात सिद्धार्थ सखाराम डोळस यांचे डोके फुटून ते जखमी झाले असून त्यांच्या पत्नीला देखील मारहाणीत दुखापत झाली आहे. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार,सिद्धार्थ सखाराम डोळस यांनी घरासमोर दुकान सुरू केल्याच्या कारणावरून काही जणांकडून त्यांना सातत्याने त्रास दिला जात होता. दारासमोरील रस्त्याच्या कारणावरून वारंवार वाद घालत “तुला येथे राहू देणार नाही” अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, आज कुसळकर व मोहिते परिवारातील काही जणांनी घरात घुसून सिद्धार्थ डोळस व त्यांच्या कुटुंबीयांवर दगडाने हल्ला करत मारहाण केली. यावेळी परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेनंतर जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पदाधिकाऱ्यांसह गावातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. यामध्ये राजभाऊ जोगदंड, विजय मोहनराव सुपेकर, भास्कर जावळे, महेश अण्णा आठवले यांच्यासह डोळस परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.

घटनेमुळे शिवणी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले,अद्याप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button