रंगनाथ( बाबू )राऊत या सर्वसामावेशक चेहऱ्याला जनतेने संधी द्यावी – गणेश राऊत.
नाळवंडी गावातील मतदार रंगनाथ राऊत यांच्या पाठीशी.

नाळवंडी प्रतिनिधी- नाळवंडी गावातील उमदा नेतृत्व म्हणून स्व. संतोष राऊत यांची ओळख होती त्यांच्या अकाली जाण्याने नाळवंडीचा राजकारणामध्ये एक राजकीय पोकळी निर्माण झालेली असून याच जागेसाठी वार्ड क्रमांक ३ आता नाळवंडी ग्रामपंचायत मध्ये पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे या निवडणूकी साठी दोन उमेदवार रिंगणात असून. खर तर ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. परंतु विकासाच्या कामाला अडथळा म्हणून ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. संतोष राऊत यांच्यासारखा गावचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्यांच्याच घरातील रंगनाथ (बाबू) राऊत यांना ग्रामस्थांनी भरघोस मते देत विजयी करावे असे आवाहन नाळवंडी गावातील जनतेला गणेश राऊत यांनी केलेले आहे. नाळवंडी याठिकाणी मयत ग्रामपंचायत सदस्य संतोष राऊत यांच्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाललेली असून रंगनाथ (बाबू) राऊत हे प्रबळ व दावेदार आहेत व ते पुढील भविष्यकाळामध्ये गावची सेवा आत्मीयतेने करू शकतात व संतोष राऊत यांचे सुजलाम सुफलाम नाळवंडी करण्याचे स्वप्न रंगनाथ( बाबू ) राऊत पूर्ण करू शकतात ते राहण्यासाठी वार्ड क्रमांक तीन मध्ये आहेत जे की जनतेला 24 तास उपलब्ध असतात. त्यासाठी या ठिकाणच्या जनतेने त्यांना एक वेळा सेवेची संधी द्यावी असे जाहीर आवाहन गणेश राऊत यांनी केलेले आहे तर वार्ड क्रमांक ती३ मधील जनतेने एकदा त्यांना संधी द्यावी व आपली कामे करून घ्यावीत असे देखील भावनिक आव्हान यावेळी गणेश राऊत यांनी केलेले आहे.









