ब्रेकिंग न्यूज

२ लाख ६६ हजारांचा गांजा जप्त.

बीड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

बीड, दि. २१ एप्रिल २०२६ — स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल २ लाख ६६ हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना गुप्त माहिती मिळाली की, गेवराई तालुक्यातील सिरसदेवी गावात एक इसम गांजा बाळगून त्याची चोरटी विक्री करत आहे. या माहितीची खातरजमा करून कारवाईचे आदेश देण्यात आले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व तलवडा पोलीस ठाण्याच्या पथकाने सिरसदेवी येथे छापा टाकला. या कारवाईत शेख रईस शेख युसूफ (वय २५, रा. सिरसदेवी) याच्या घरातून ८ किलो ८८८ ग्रॅम वजनाचा, अंदाजे २,६६,६४० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२०/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि सुशांत सुतळे, पोह /आनंद मस्के, विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, बबन सलगर, चापोह /अतुल हराळे व पोस्टे तलवडा येथील सपोनि जंजाळ, पोउपनि अन्नलदास, पोह/देवकते, गडदे, जावळे, राठोड, जाधव व मपोअ/मदने सर्व नेमणुक पोलीस ठाणे तलवडा यांनी मिळून केली आहे.

 बीड जिल्हा नशा मुक्त करण्यासाठी अंमली व नशेच्या पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button