बीड पुन्हा हादरले : अल्पवयीन मुलीवर अत्याचार.
बीड शहरातील घटना; अत्याचार करणारा पोलिसांच्या ताब्यात.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे.
दोन दिवसांपूर्वीच बीड तालुक्यात एका महिलेला रात्री घरातून उचलून घेऊन जात चावडीला बांधून अत्याचार केल्याची संताप जनक घटना घडली होती त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं झाला होता. सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत असलेले बीड जिल्हा हदरला आहे
पेठ पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी (दि. 16 मार्च) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार शेजारी राहणाऱ्या एका १६ वर्षीय तरुणाने घरात आलेल्या एका पाच वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप आहे. घटना घडल्यानंतर अत्याचारित मुलीने झालेली घटना आईला घरी जाऊन आईसमोर सांगितल्यानंतर प्रकार उघडकीस आला.त्यानंतर आज दिनांक 17 मार्च सकाळी मुलीचे आई-वडील आणि मुलगी पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले.या घटनेची माहिती बीड पोलीस अधिक उपाधीक्षक पूजा पवार व पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना देखील देण्यात आली.
या प्रकरणी पेठ बीड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. तसेच पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला पोलीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.






