घरात ठेवलेला गॅस सिलेंडरचा साठा जप्त;एकावर गुन्हा दाखल.
पहाटे पेठ बीड पोलीस व पुरवठा विभागाची कारवाई.

बीड (प्रतिनिधी)बीड देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने याच्या झळा सर्वसामान्य नागरिकाला लागत आहेत.
राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणू लागला असून ग्राहक गॅस कंपनीच्या बाहेर लांबच्या लांब रांगा लावून नागरिक सिलेंडर घेत आहेत.
सिलेंडर घेण्यासाठी ऑनलाईन नंबर वर बुकिंग करूनच सिलेंडर मिळत असून घरपोच गॅस सर्वच कंपन्यांनी सिलेंडर देणे बंद केले यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बीड शहरात काही ठिकाणी जादा दराने सिलेंडर विक्री होत असून काही साठेबाज तर सिलेंडरचा काळाबाजार करत असल्याची देखील माहिती मिळत आहे
दिनांक 14 मार्च शनिवार रोजी पहाटे बीड शहरातील शिवनेरी नगर परिसरात घराच्या पोर्चमध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा अवैध साठा केल्याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल ७३ हजार ५५० रुपयांचा सिलेंडर साठा जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत एकनाथ सुपेकर (वय ३७), निरीक्षण अधिकारी, पुरवठा विभाग, तहसील कार्यालय बीड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. अजय मोहनराव घोडके (वय ३६, रा. शिवनेरीनगर, इमामपुर रोड, बार्शी नाका, बीड) याने स्वतःच्या घराच्या पोर्चमध्ये घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा अवैधरित्या साठा करून ठेवला होता.
दि. १४ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास शिवनेरीनगर (गवळगल्ली) परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात इंडेन, भारत गॅस व एच.पी. गॅस कंपनीचे भरलेले व रिकामे असे एकूण अनेक सिलेंडर जप्त करण्यात आले. या सर्व सिलेंडरची अंदाजे किंमत ७३,५५० रुपये इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७८/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीसApi नित्यानंद उबाळे, हेड कॉन्स्टेबल -नितीन राठोड,पोलिस अंमलदार-कल्याण जाधवपो,लीस अंमलदार- अंकुश राठोड होमगार्ड – पठाणपु,पुनिरीक्षण अधिकारी तहसील कार्यालय सह पोलीस व पुरवठा विभागाने केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारगळ करीत आहेत. गुन्हा नोंदणीची प्रक्रिया सफौ. १३७२ खेत्रे यांनी केली.






