बीड शहरातून तरुण बेपत्ता.
वॉकिंगला गेलेला तरुण परतलाच नाही;माहिती देण्याचे कुटुंबीय व पोलिसांनी केले आवाहन.

बीड : शहरातील अंकुश नगर परिसरातील रोहन कल्याणराव कोलगंडे (वय ३६) हे दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी वॉकींगला जातो असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र ते त्यानंतर घरी परतले नसल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात सर्वत्र शोध घेतला. परंतु त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. विशेष म्हणजे त्यांचा मोबाईल फोन घरातच असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता आलेला नाही.
याप्रकरणी कुटुंबीयांनी बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनीही नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
रोहन कोलगंडे यांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : उंची अंदाजे ५ फूट ७ इंच, रंग गोरा, केस काळे. घरातून बाहेर पडताना त्यांनी अंगात काळ्या रंगाचा टी-शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व पायात चप्पल घातली होती.
सदर व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा ते कुठे आढळल्यास तात्काळ शिवाजी नगर पोलीस ठाणे किंवा संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासन आणि कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.







