ब्रेकिंग न्यूज

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या अध्यक्षपदी बाळू कदम; सचिवपदी सागर धन्वे

पेठ बीड भागात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

बीड (प्रतिनिधी) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भिमशक्ती क्रिडा मंडळ व व्यायाम शाळा, बलभीम नगर पेठ, बीड यांच्या २०२६ सालच्या कार्यकारिणीची निवड दिनांक ५ मार्च २०२६ रोजी सर्वानुमते करण्यात आली. या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी बाळू कदम तर सचिवपदी सागर धन्वे यांची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रशांत वडमारे, कोषाध्यक्षपदी लला हतागळे, सहसचिवपदी गोविंद डोईजड, सहकोषाध्यक्षपदी आदर्श शिंदे तसेच व्यवस्थापकपदी कपिल ढाकणे आणि अभिजीत गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, निबंध स्पर्धा, वृक्षारोपण, भीमगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच प्रबोधनपर व्याख्यानमाला अशा विविध सामाजिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

भिमशक्ती क्रिडा मंडळाच्या वतीने मागील वर्षी एक सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मंडळातील सदस्यांच्या घरी मुलीचे लग्न असल्यास आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने मंडळाचे सदस्य बाळू मामा कोरडे यांच्या मुलीच्या लग्नासाठी मंडळाच्या वतीने १० हजार रुपयांची आर्थिक मदत देत संकल्पाची पूर्तता करण्यात आली.

या बैठकीस मंडळातील ज्येष्ठ मार्गदर्शक, पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या वतीने सामाजिक कार्य आणि प्रबोधनपर उपक्रमांची परंपरा पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button