बीड जिल्हा

*अंबाजोगाई ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून विकसित होणार: सहभागी होण्यासाठी इच्छुक संस्था,नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन

१० मार्च २६ पूर्वीच प्रस्ताव द्यावे.

*अंबाजोगाई’पुस्तकांचे गाव’
म्हणून विकसित होणार; सहभाग घेण्यासाठी संस्था,नागरिक करण्याचे आवाहन*
अंबाजोगाई ;प्रतिनिधी:-
अंबाजोगाई शहराला पुस्तकांचे गाव म्हणून विकसित करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. या महत्वाकांक्षी
प्रकल्पात सहभागी होण्यासाठी प्रशासनाने शहरातील संस्था, नागरिक यांच्या कडून प्रस्ताव मागवले आहेत.महाराष्ट्र राज्याच्या उद्योग व मराठी भाषा मंत्र्यांनी
अंबाजोगाई ला ‘पुस्तकांचे गाव’ घोषित केल्या नंतर बीड जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी अप्पर जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांची समनवय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
राज्य मराठी विकास संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या प्रकल्पाचा सर्वकश शासन निर्णय अद्याप प्रलंबीत असला तरीही त्यापुर्वी शहरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सं स्था,नागरिक यांची यादी तयार करण्यासाठी अंबाजोगाई तील इच्छुकानी आपले प्रस्ताव दि १० मार्च २०२६ पर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे विहित मुदतीनन्तर अर्जाचा कसलाही विचार केला जाणार नाही असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button