लाच घेताना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात.
तहसीलदाराने सॉलंसीसाठी मागितले ५० हजारांची लाच.

बीड, प्रतिनिधी बीड तालुक्यातील परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाच प्रकरणात अडकल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) उघडकीस आली. सालंसी (ऐपतीचे) प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती, मात्र नंतर तडजोडीनंतर २० हजार रुपयांवर व्यवहार ठरल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही एसीबी पथकाने आवश्यक पुरावे गोळा केले असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
या घटनेमुळे परळी तालुक्यातील महसूल प्रशासनात खळबळ उडाली असून जिल्ह्यातही या कारवाईची चर्चा सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.
भ्रष्टाचारा विरोधातील या कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून प्रशासनात पारदर्शकता राखण्यासाठी अशा कठोर कारवाया आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.तहसीलदारावर कारवाई झाल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली.
ही करवाई DYSP सोपान चिटमपलले, मच्छिंद्र बिडकर, अमोल खरसाडे,प्रदीप सुरवसे, अंबादास पुरी यांनी केली.










