ब्रेकिंग न्यूज

रिव्हॉल्वर घेऊन फिरणारा पोलिसांच्या ताब्यात

बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड (प्रतिनिधी)बीड छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सुरू असलेल्या बंदोबस्तादरम्यान बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कंबरेला गावठी कट्टा (बंदूक) लावून फिरणाऱ्या एका विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. बीड जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापासून रिवाल्वर आढळून येत असून या रिवाल्वर कोण विक्री करत किंवा कुठून आणल्या जातात याची सखोल तपासणी करण्याची नितांत गरज आहे.

आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी बंदोबस्तावर असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, एक विधीसंघर्ष बालक कंबरेला गावठी बनावटीचा कट्टा लावून माने कॉम्प्लेक्स परिसरात थांबलेला आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.

या कारवाईत संबंधित विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून एक गावठी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर त्यास पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक बीड, सचीन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, तसेच शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या पथकात सपोनि धनराज जारवाल, पोउपनि श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, आनंद मस्के, अर्जुन यादव, मनोज परजणे व चालक सिद्धेश्वर मांजरे यांनी सहभाग घेतला.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button