
बीड (प्रतिनिधी) – बीड शहरातील बार्शी नाका परिसरात मंगळवार, दि. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी एक अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. बार्शी रोडवरील हिना पेट्रोल पंप समोर असलेल्या OLA Electric दुचाकी शोरूमच्या बाजूला ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सदर व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली असून त्याचे अंदाजे वय ५५ ते ६० वर्षे आहे. त्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर फोटोमधील व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास त्यांनी पेठ बीड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास ठोंबरे व अल्ताफ शेख यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक: ९९२३२७३५६८




