
*अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव मध्ये मध्यरात्री गोळीबाराचा थरार*
अंबाजोगाई प्रतिनिधी:- जनसामान्यात घबराटीचे वातावरण आंबेजोगाई जवळ सायगाव येथे मध्यरात्रीच्या वेळी दोन पिस्तलसह सय्यद अहमद अली मुकशीर अली हाश्मी नामक तरुणाला बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ताब्यात घेण्यात आले .या तरुणाने 21 जानेवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास सायगाव मध्ये अग्निशास्त्राने गोळीबार केला .पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली ,यामध्ये नऊ एम एम पिस्टल जपानी बनावटीचे चंदेरी रंगाचे रिवाल्वर तीन जिवंत काडतूस आणि एक मोटरसायकल ताब्यात घेण्यात आले असून बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासंदर्भात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुले हे करत आहेत







