ब्रेकिंग न्यूज

बाळासाहेब गुंजाळ यांनी केलेल्या काम व जनसेवेमुळे जनतेनेच निवडणूक हाती घेतली. 

"काम करत आलोय,काम करत राहू" फक्त आशिर्वाद द्या - बाळासाहेब गुंजाळ 

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील प्रभाग क्र.21 ब मधील अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना आणि शिवसंग्राम मित्र पक्षाचे उमेदवार धर्मराज ऊर्फ बाळासाहेब लक्ष्मण गुंजाळ यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामांमुळे जनतेनेच त्यांची निवडणूक हाती घेतली आहे. आजपर्यंत जनेसवेसाठी काम करत आलोय आणि यापुढेही काम करत राहू ,तुम्ही फक्त आशिर्वाद द्या असे आवाहन बाळासाहेब गुंजाळ यांनी केले आहे.

बीड शहरातील प्रभागातील असो की इतर ठिकाणच्या नागरिकांचे कोणतेही काम असो त्या ठिकाणी बाळासाहेब गुंजाळ 24 तास सेवेत असतात. पाणी, रस्ते, नाल्या, लाईट या मुलभूत सुविधांसाठी ते नेहमीच तत्पर असतात. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या या माझ्या स्वत:च्या समस्या आहेत असेच समजून त्यांनी आत्तापर्यंत लोकांची कामे केली आहेत.

बीड शहरातील प्रभाग क्र.21 मधील गांधी नगर हा भाग 2011 च्या पूव बहिरवाडी ग्रामपंचायत हद्दीत येत होता. मात्र 2011 मध्ये या भागाचा न.प.हद्दीमध्ये समावेश झाला. तेव्हापासून आजपर्यंत बाळासाहेब गुंजाळ यांनी या भागामध्ये तीन पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या. वादात असलेली जागा नगर पालिकेला मिळवून देवून त्या ठिकाणी या टाक्या उभा करण्याचे काम त्यांनी केले. नाळवंडी रोड, नगर परिषदत हद्दीमधील रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली होती. हा रोड जिल्हा परिषद हद्दीत असतानाही हा रस्ता नगरपालिकेकडून मंजुर करुन घेत लोकांची गैरसोय दुर केली. नाथापुर रोड हा रस्ता तेलगाव नाका ते खंडेश्वरी पर्यंत करुन घेतला. 2011 ते 2025 या कालावधीत या भागात 15 ते 20 डि.पी. मंजुर करुन घेतल्या. प्रभागातील कुबा मस्जिद, रहेमानिया मस्जिद, नुर मस्जिद, नुराणी मस्जिद, बजरंगबली मंदिर, गांधी नगर, थलमा मंदिर, महादेव मंदिर, या भागात अनेक लहान मोठे रस्ते केले. नाल्या केल्या, विजेची कामे पूर्ण केली.प्रभागातील नागरिकांना कसलाच त्रास होवू नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले. घरकुल, रहिवाशी प्रमाणपत्र, पिटीआर, ई श्रमकार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड अशा विविध कागदोपत्रांसाठी प्रत्येकवेळी नागरिकांना मदतीची भूमीका ठेवली. संजयगांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती योजना अशा योजनांच्या माध्यमातून निराधारांना आधार दिला. लाडकी बहिण योजनेचा जास्तीत जास्त भगिनींना फायदा व्हावा यासाठी कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाईन अडचणी सोडविण्याच्या अनुषंगाने प्रभागात वेळोवेळी शिबीरे घेतली. आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर अशा उपक्रमातून सामाजिक बांधीलकी जपली. करोना काळात 41 दिवस 2000 लोकांना घर पोहोच जेवण देण्याचे पुण्याचे काम केले. हा भाग आऊटस्कट असल्यामुळे टँकरमार्फत पाणी पुरवठा केला. वार्डातील नागरिकांसाठी प्रत्येक चौकात पिण्याच्या पाण्याचे पाईंट बनवले, ज्या भागात रस्ते नाहीत तिथे रस्ते करुन घेतलेत. नवरात्र उत्सव, शिवजयंती उत्सव, गणेश उत्सव, भिम जयंती उत्सव, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव, संदल अशा विविध उत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतीक वारसा जोपासत भाईचारा आणि राष्ट्रीय एकोपा वाढीस लावण्याचा प्रयत्न केला. या भागात स्मशानभूमी, ओपन जिम, वॉकींग ट्रॅक, गार्डन आणि आऊटस्कटमधील भागात रस्ते, नाल्या आणि पाईपलाईनचे काम राहिले आहे. मुस्लिम समाजासाठी शादीखाना, बौद्ध समाजासाठी बौद्ध विहार, सांस्कृतिक सभागृह अशा कामांसाठी पाठपुरावा करणार असून ही कामे जलद गतीने प्रभागात कशी होतील यासाठी पुन्हा एकदा प्रभागातील नागरिकांनी माझ्या पाठीशी मतरुपी ताकद उभी करावी, आशिर्वाद द्यावेत आणि दुवा करावी असे आवाहन बाळासाहेब गुंजाळ यांनी केले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button