प्रभाग २५ मध्ये बदलाची हाक मतदारांचा विश्वास अजिंक्य शिराळेच्या बाजूने.
गोरगरिबांना मदत,विकासदृष्टी आणि कार्यतत्परतेमुळे मिळतोय या प्रभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद.

बीड/प्रतिनिधी :बीड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मध्ये अजिंक्य बाबुराव शिराळे यांच्या भोवती समर्थकांची अभूतपूर्व एकजूट पाहायला मिळत आहे. “माणूस नवा पण विश्वास जुना” या ओळखी सोबत अजिंक्य शिराळे यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून प्रचारादरम्यान प्रत्येक गल्लीबोळातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
कोरोना काळातील समाजकार्य,मदत लोकांच्या लक्षात :
कोरोना काळात कोणताही पदभार नसताना नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत बीड शहरातील व आजूबाजूच्या वस्त्यामधील नागरिकांना जेवणाचा डबा,मास्क, औषधे, अन्नधान्य, ऑक्सिजन व्यवस्था अशा अनेक सेवा पुरवल्यामुळे अजिंक्य शिराळे लोकांच्या मनात घर करून आहेत. तसेच पाडळशिंगी टोल नाका चौसाळा जवळील टोल नाका वरील पोलीस बांधवांना त्या ठिकाणी जीवनाचा पोहोच डब्बा देण्याची देखील व्यवस्था अजिंक्य शिराळे यांनी केली होती.
शून्यापासून सुरूवात करून तरुणांना रोजगार :
अजिंक्य शिराळे यांनी शून्यापासून उभा केलेल्या व्यवसायातून अनेक तरुणांना रोजगार मिळवून दिला. समाजकारणात सक्रिय असूनही त्यांनी कधीही राजकारणाचा वापर स्वार्थासाठी केला नाही, असा नागरिकांचा प्रतिसाद आहे.
योगेश क्षीरसागरांचे विश्वासू आणि विकासाची ऊर्जा:
डॉ. योगेश क्षीरसागरांचे विश्वासू नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या शिराळे यांच्यात विकासाची ऊर्जा आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती आहे.
पद नसताना १००० LED सुविधा लोकांसाठी स्वखर्चातून काम.
कोणतेही पद नसताना प्रभागामध्ये स्वखर्चातून १००० एलईडी सुविधा उपलब्ध करून देत नागरिकसेवा करण्याचा आदर्श त्यांनी घातला आहे.
दिलेल्या शब्दांना जागणारा भावी नगरसेवक :
“मी पणा नसलेलं नेतृत्व” ही ओळख कमावणाऱ्या शिराळे यांच्याकडे प्रभागातील नागरिक आशेने पाहत असून, दिलेल्या शब्दांना जागणारा आणि प्रभागाचा चेहरा बदलणारा भावी नगरसेवक म्हणून त्यांना पाहिले जात आहे.
मतदारांचा भरभरून प्रतिसाद :
अजिंक्य शिराळे हे या प्रभागात नागरिकांच्या गाठीभेटी घेत असून, रात्रीच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर यासह इतर मान्यवराच्या उपस्थितीत कॉर्नर बैठक ठेवण्यात आली होती या बैठकीचे स्वरूप सभेत दोन हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला.दररोज वाढत असलेला जनसमर्थनाचा लाट पाहता प्रभाग क्रमांक २५ मध्ये अजिंक्य शिराळे यांचा विजय निश्चित असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.








