शिवसेना उपजिल्हा प्रमुखाचा सेनेला जय महाराष्ट्र !
ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने शिवसेनेला धक्का.

बीड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख राजू भारत महुवाले यांचा पक्षश्रेष्ठींना पक्षातीलच गटबाजीला कंटाळून पक्षसृष्टीकडे राजीनामा सुपूर्द केला.
राजीनामाच्या पत्रात पक्षातील काही नेत्यांच्या वागणुकी विषयी तक्रारींचा भडिमार केला आहे. जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्या पक्षावरील षडयंत्रकारी भूमिकेमुळे कामकाजात अडथळे येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला आहे.
“दोन वर्षे पद सांभाळूनही सहकार्य नाही” – महुवाले.
बीड शहरात दोन वर्षांपासून उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्य करत असताना स्थानिक पातळीवर नेत्यांकडून सहकार्य मिळाले नाही जिल्हाप्रमुखाकडून वारंवार अन्याय व पक्षातील अंतर्गत कारस्थानांना सामोरे जावे लागत असल्याने कामात अडथळे निर्माण झाले असल्याचे राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
🔹 स्थानिक पातळीवर संघर्ष, तक्रारी केल्या पण कार्यवाही नाही
मवूवाले म्हणतात की, त्यांनी वारंवार शांततेने, संघटनात्मक पद्धतीने पक्षातील समस्या मांडल्या, परंतु,जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्या निर्णयपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही
पक्षाच्या कामकाजात पारदर्शकता नसल्याचा आरोपही त्यांनी केला
🔹 “न्याय न मिळाल्याने राजीनामा”
महाडिक यांनी सांगितले की,स्थानिक अडचणी, मनमानी निर्णय,आणि कार्यकर्त्यांवरील अन्याय रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु वरिष्ठांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी त्यांनी उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
🔹 “शेवटचा जय महाराष्ट्र!”
पत्राच्या शेवटी राजू महुवाले यांनी लिहिले आहे :
“जड अंतःकरणाने शेवटचा जय महाराष्ट्र…!”
यातून त्यांच्या नाराजीची तीव्रता स्पष्ट दिसून येते.
🔹 पक्षात खळबळ – बीडमध्ये मोठे राजकीय वादळ या पत्रामुळे बीड शिवसेना उद्धव गटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जिल्हाप्रमुखांवर थेट आरोप :
कार्यकर्त्यांच्या न्याय-हक्कांच्या प्रश्नांची उचल
उपजिल्हा प्रमुख पदाचा अचानक दिलेला राजीनामा यामुळे आगामी बीड नगरपालिका आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे.
महुवाले यांचा हा राजीनामा बीड शिवसेनेत नवीन समीकरणांची सुरुवात ठरेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिलेले शिवसिनेला धक्का मानला जात आहे.







