ब्रेकिंग न्यूज

DYDP पूजा पवार यांची हवाला रॅकेटवर मोठी कारवाई.

१७ लाखांची रोकडसह पैसे मोजण्याची मशीन जप्त;शहर पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह ?

बीड(प्रतिनिधी)बीड पोलीस अधीक्षक पदाचा पूजा पवार यांनी पदभार घेतल्यापासून अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांनी बीड मध्ये मटका, गुटखा यावर मोठी कारवाई केली होती.

   दिनांक 18 नोव्हेंबर रोजी शहरातील हवाला रॅकेटवर डीवायएसपी पूजा पवार यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शहर पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या एका मोठ्या हवाला व्यवहारावर छापा टाकत तब्बल १७ लाखांची रोकड ताब्यात घेण्यात आली. निवडणूक काळात ही कारवाई झाल्याने प्रशासनात तसेच सर्वसामान्यांत मोठी चर्चा सुरू आहे.

मसरत नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण चालत असल्याची माहिती डीवायएसपी पूजा पवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने सायंकाळी छापा मारून १७ लाखांची रोकड, पैसे मोजण्यासाठी लागणारी मशीन,यंत्रसामग्री जप्त करत एक आरोपीला ताब्यात घेतले असून शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शहर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह  ?

या संपूर्ण प्रकरणात एक गंभीर प्रश्न मात्र उपस्थित झाला आहे :

शहर पोलीस ठाणे हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर हवाला रॅकेट सुरू होते, याची माहिती शहर पोलिसांना नसेल का?

स्थानिक नागरिकांच्या मते, बीड शहरात असे ४,५ हवाला रॅकेट आणखी चालू असल्याची चर्चा आहे तरीही शहर पोलिसांच्या स्तरावर अशा प्रकारची मोठी कारवाई आतापर्यंत झालेली दिसत नाही. त्यामुळे शहर पोलीस ठाण्याच्या हालचाली, दक्षता आणि गुप्त माहिती यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निवडणूक काळात पैशांची मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय झाल्याचे दिसत असले तरी, शहर पोलिसांकडून अशा रॅकेट्सवर सातत्याने ठोस कारवाई होण्याची मागणी नागरिक करत आहेत.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी पूजा पवार, एपीआय पुजारी, सचिन आगलावे व मनिषा केदार यांच्या पथकाने केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button