ब्रेकिंग न्यूज

भाजपचे जेष्ठ नेते महादेवराव कवठेकर यांचे निधन.

मोंढा भागातील"अमरधाम"मध्ये पाच वाजता अंत्यसंस्कार.

बीड–भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी नगरसेवक महादेवराव नारायणराव कवठेकर यांचे मंगळवारी (दि-18 नोव्हेंबर ) रोजी सकाळी वार्धक्याने निधन झाले. भाजपाला कमळ चिन्ह मिळाल्यानंतर झालेल्या बीड नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत महादेवराव कवठेकर हे भाजपचे पहिले एकमेव निवडून आलेले नगरसेवक होते. 

 महादेवराव कवठेकर यांनी समाजकारण आणि राजकारण याचा योग्य मेळ साधत 1985 साली भाजपला फारशी अनुकूल परिस्थिती नसतांना देखील विजय मिळवून दिला होता.शेवटपर्यंत ते समाजकारणात सक्रिय होते.ते श्री.शिवाजीराव कवठेकर यांचे ज्येष्ठ बंधू तर अविनाश नाईकवाडे व नगरसेवक अमर नाईकवाडे यांचे मामा होत.त्यांच्या पश्चात पवन, निलेश (विकी) ही दोन मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अंत्ययात्रा सायंकाळी 5 वाजता राहते घर रंगार गल्ली, जुना मोंढा, बीड येथून निघणार असून मोंढ्यातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कवठेकर परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.ë

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button