ब्रेकिंग न्यूज

भाजपकडून घुमरे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी.

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच उमेदवार जाहीर.

बीड (प्रतिनिधी)बीड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची लगबग सुरू असून आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय वातावरणात चांगलीच धाकधूक निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षांनी आजपासून आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे.

 डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी पक्षांमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून विधानसभा अध्यक्ष चा राजीनामा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये भाजपात प्रवेश केल्यानंतर बीडमधील राजकीय समीकरणाला नवीन वळण मिळाले. त्यानंतर भाजपने मोठा निर्णय घेत डॉक्टर घुमरे यांच्या पत्नींचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून नाव जाहीर केले आहे.

बीड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर घुमरे यांच्या पत्नीला दिलेल्या या संधीमुळे भाजप पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. दरम्यान, इतर पक्षांनी अद्यापही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नसल्याने इच्छुकांमध्ये चिंता वाढत असल्याचे दिसत आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button