ब्रेकिंग न्यूज

केज मधील जुगार अडयावर पोलिसांची धाड.

केज पोलीस यांची कारवाई.

 

 

केज शहरात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ; मटका चालक गजाआड,मुख्य सुत्रधारा वर ही गुन्हा दाखल अंबाजोगाई/प्रतिनिधी:–

मा.पोलीस अधीक्षक बीड व मा.अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली केज शहरात अवैध जुगार व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी कल्याण मटका खेळणाऱ्यांना रंगेहाथ पकडले.दि.14 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या या कारवाईत श्री.वेंकटराम (भापोसे) यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोउपनि संजय फड, पोह/2011 अशोक खेलबुडे,पोह/1598 उत्रेश्वर केदार व पोअं/2097 कुलदीप खंदारे यांच्या पथकाने वसुंधरा बँकेच्या मागील बंद खोलीवर छापा टाकला.

पहिली कारवाई

पहिल्या छाप्यात शिवराज भगवानराव पाटील (वय 40,धारूर रोड,केज) व शेख शकील महेमुद (वय 42,रोजा मोहल्ला,केज) हे दोघेही कल्याण मटका खेळताना रंगेहाथ पकडले.त्यांच्या ताब्यातून रुपये 89,960 नगदी,मोटारसायकल, मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोह/2111 अशोक खेलबुडे यांच्या फिर्यादीवरून शिवराज पाटील,शेख शकील महेमुद,गणेश खराडे व शेख चंद सेठ (रा.केज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई

दुसऱ्या छाप्यात एकजण विनापरवाना बेकायदेशीर कल्याण मटका खेळताना मिळूनआला.त्याच्याकडून रुपये 16,390 नगदी, मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोउपनि संजय फड यांच्या फिर्यादीवरून एकजणा वर व गणेश खराडे (रा. केज) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही संपूर्ण कारवाई मा.पोलीस अधीक्षक बीड,मा.अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.वेंकटराम (भा.पो.से.) यांच्या आदेशाने अंमलात आणली.पथकात पोउपनि संजय फड,पोह/2011 अशोक खेलबुडे,पोह/1598 उत्रेश्वर केदार व पोअं/2097 कुलदीप खंदारे यांनी विशेष मेहनत घेतली.पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेविरोधात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,आणखी कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.दरम्यान अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अटकेची टांगती तलवार डोक्यावर असल्याचा धसका घेऊन पलायन केले आहे..

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button