ब्रेकिंग न्यूज

बीडमध्ये अजित पवार गटाला धक्का ? डॉ.योगेश क्षीरसागर स्वतंत्र निर्णय घेण्याच्या तयारीत !

डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हालचालींनी बीडमध्ये राजकीय तापमान वाढले ! निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष

अजित पवार गटातून वेगळे होण्याची शक्यता? स्वतंत्र गटस्थापनेची चर्चा.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुका तारखा जाहीर झालेले सर्वच पक्षांनी आपल्या आपली फिल्डिंग लावल्याचे दिसत आहे. बैठका व गाठीभेटीवर जास्तीत जास्त भर दिला जात असून, इच्छुकांची गर्दी वाढल्याने नेत्यांची डोकेदुखी मात्र वाढल्याचे दिसत आहे. 

आज दिनांक 14 मे रोजी सकाळी डॉक्टर योगेश शिरसागर यांच्या खाजगी कार्यालयावर गर्दी केली होती, या गर्दीतूनच योगेश भैया क्षीरसागर वेगळा निर्णय घेण्याची चर्चा होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या कालच्या परळी दौऱ्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज सकाळपासूनच त्यांच्या खाजगी कार्यालयाबाहेर समर्थकांची मोठी गर्दी उसळलेली दिसली. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षातील जागावाटपासंदर्भात समन्वय न साधल्याने डॉ. क्षीरसागर स्वतंत्र निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. त्यांच्या निर्णयावर बीडचे राजकीय गणित अवलंबून असून, त्यांनी अजून भूमिका स्पष्ट न केल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

जयदत्त क्षीरसागर यांना सोबत घेऊन वेगळी आघाडी उभारण्याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. यामुळे बीडच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता बोलली जात आहे.

आज होणाऱ्या घडामोडींवर राज्यभर लक्ष लागले असून, डॉ. योगेश क्षीरसागर काय भूमिका घेतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ते अजित पवार गटातून बाहेर पडून स्वतंत्र गटस्थापना करणार की इतर पक्षाशी हातमिळवणी करणार? याबाबतचा निर्णय आज स्पष्ट होणार आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button