सातिराम(आण्णा)ढोले यांच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त 48 तरुणांचे रक्तदान.
सातिराम(आण्णा)ढोले सामाजिक फाउंडेशनचा उल्लेखनीय उपक्रम.

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा भासत असून रक्तासाठी गोरगरिबांच्या खिशाला कात्री लागत आहे.
बार्शी नाका परिसरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व उद्योजक सातिराम आण्णा ढोले पाटील यांच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधत 48 तरुणांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हा उल्लेखनीय उपक्रम सातिराम आण्णा ढोले सामाजिक फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, बीड यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मे महिन्याच्या कडक उन्हातही युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून चंद्रकांत शेळके,स्वप्निल गलधर, विनोद मुळुक, संजय उडाण, परमेश्वर सातपुते, अनिल घुमरे, मनीष कुपकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच शहराध्यक्ष सुहास पाटील, पंडित माने, नानासाहेब जाधव, सतीश जाधव, अशोक ढोले, संजय मोटे, अमित कुमार मोदी, ऋषिकेश ढोले, शंशाक धन्वे, सय्यद नवाब, अशोक जाधव, हनुमान पटाईत, दत्ता चव्हाण, मेघराज चव्हाण, मच्छिंद्र वाणी, परमेश्वर ढोले यांच्यासह हजारो कार्यकर्ते, मित्रपरिवार व पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी सातिराम आण्णा ढोले पाटील यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. समाजोपयोगी उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी विशेष कौतुक व आभार व्यक्त केले.











