प्रभाग क्रमांक ३ ब मध्ये मतदाराचा उत्सुर्फ प्रतिसाद.दुपारपर्यंत ५०% मतदान
आ. विजयसिंह पंडित,डॉ.योगेश क्षीरसागर सह शहरात नेते मंडळी तळ ठोकून.

बीड (प्रतिनिधी) बीड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत प्रभाग क्रमांक ३ ब मधील मतदान प्रक्रिया आज शुक्रवार, दिनांक 20 डिसेंबर रोजी शांततेत पार पडत आहे. दुपारपर्यंत सुमारे ४०% मतदान झाले असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (तुतारी गट) यांच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांकडून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली जात असून कार्यकर्ते सकाळपासूनच सक्रिय आहेत.
मतदान प्रक्रियेदरम्यान गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. योगेश क्षीरसागर यांनी मतदान केंद्र परिसरात ठाण मांडले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३ ब मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.
बीड शहरातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या या प्रभागाकडे सर्वच मतदारांचे आणि नेत्यांचे लक्ष लागले असून विविध पक्षांचे प्रमुख नेते मतदान केंद्राबाहेर तळ ठोकून बसले आहेत.
यावेळी माध्यमांशी बोलताना डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांनी, “आमचे उमेदवार अमृत काका सारडा हे विक्रमी मतांनी निवडून येणार आहेत,” असा विश्वास व्यक्त केला.
एकूणच प्रभाग क्रमांक ३ ब मधील मतदानामुळे बीड शहराच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











