ब्रेकिंग न्यूज

बीडमध्ये पुन्हा चैन स्नॅचिंग,महिला जखमी.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे दागिने हिसकावले;महिलांत भीतीचे वातावरण.

 

बीड (प्रतिनिधी )बीड शहरात,जिह्ययात मागील काही महिन्यात चैन स्नॅचिगच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसत आहे यामुळे महिला वर्ग तसेच नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बीड शहरातील कॅनॉल रोड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. दागिने हिसकावताना महिलेचा तोल जाऊन त्या रस्त्यावर पडल्याने जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सकाळी फिरणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जाधव नामक महिला आपल्या पतीसोबत कॅनॉल रोडवर मॉर्निंग वॉक करत होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने हिसकावले आणि भरधाव वेगाने पसार झाले. दागिने खेचल्याच्या धक्क्यात महिला रस्त्यावर पडल्याने त्यांना दुखापत झाली. त्या चोरट्या सोबत एक महिला देखील दुचाकी वर बसलेली असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे, यामुळे मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलावर नजर ठेवण्यासाठी काही महिला येत असल्याचा संशय देखील व्यक्त होत आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चालवणारा तरुण होता, तर त्याच्या मागे तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला बसली होती. दोघांची हालचाल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती असून त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी संबंधित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून बीड शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिला आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी गस्त वाढवून अशा घटनांवर आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button