ब्रेकिंग न्यूज

जुगार अड्ड्यावर पेठ बीड पोलिसांचा छापा.

₹2.63 लाखांचा मुद्देमाल जप्त, 9 जुगारी ताब्यात.

बीड (प्रतिनिधी)दिनांक 2 जुलै गुरुवार रोजी पहाटे चार वाजता पेठ बीड पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारला यात रोख रक्कमसह जुगारी ताब्यात घेतले.

पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढगे कॉलनी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून नऊ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत नगदी रक्कम, जुगाराचे साहित्य आणि वाहने असा एकूण ₹2 लाख 63 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर बार्शी नाका,ढगे कॉलनी येथे पहाटे छापा टाकण्यात आला. त्यावेळी नऊ जण पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व वाहने असा एकूण ₹2.63 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी पाच वेगवेगळ्या ठिकाणी पत्त्यांचे क्लब सुरू असल्याची चर्चा असून, त्यांच्यावरही तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि पोलीस उपअधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार नितेश माने, नागरगोजे तसेच पोलीस अंमलदार गिरी, परजणे, शहाजी बहीर आणि म्हेत्रे यांच्या पथकाने केली.

या धाडीनंतर जुगार खेळविणाऱ्या वर्तुळात खळबळ उडाली असून, पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतर अवैध धंद्यांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश केळे यांनी दिली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button